राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं पावलं टाकत महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कामाला लोकांकडून दाद मिळत आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका करणार नाही. तसं वाटलं तर सूचना करेल. तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
