आशिया चषक विजेता श्रीलंकेचा टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर

0

ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आलीय. श्रीलंका बोर्डानं जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात दुष्मंता चमीरा आणि लाहिरू कुमारा यांना संधी देण्यात आलीय.

परंतु, त्यांचा सहभाग त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. तर, अशेन बंडारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चांदिमल, बिनुसार फर्नांडो आणि नुवानिडु फर्नांडो यांची राखीव खेळाडू म्हणून संघात निवड करण्यात आलीय.

आशिया चषकात श्रीलंकेच्या संघानं जबरदस्त कामगिरी करत खिताब जिंकला होता. श्रीलंकेच्या बोर्डानं आशिया चषक आणि टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला संघ जवळपास एक सारखाच आहे. आशिया चषकात संघात पुनरागमन करणाऱ्या दिनेश चांदीमलची टी-20 विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून निवड झालीय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:24 PM 16/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here