पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊनबाबतचा निर्णय होईल….?

0

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. 14 एप्रिल रोजी हा लॉकडाऊन संपणार आहे. यानंतरही लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोना व्हायरस आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांसोबत संबंधित राज्यांमधील कोरोनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतील.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:56 AM 11-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here