लोकसहभागातून नेवरे काजीरभाटी, मांडवी किनारपट्टीची स्वच्छता

0

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन सर्वत्र साजरा करीत असतानाच ग्रामस्थांच्या सहभागातून तालुक्यातील नेवरे काजीरभाटी किनारपट्टीची स्वच्छता करण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी पृथी विज्ञान मंत्रालयाने भारतातील ७५०० अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने ७५०० किलोमीटर किनारपट्टी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात सर्वत्र किनारपट्टी स्वच्छता उपक्रम शनिवारी राबविण्यात आला. याच धर्तीवर नेवरे काजीरभाटी किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.

गणपतीपुळे जवळच्या काजीरभाटी बीचवर पर्यटकांची सतत गर्दी होत असते. ग्रामपंचायतीतर्फे अनंतचतुर्दशी नंतर दि.१० रोजीही काजीरभाटीकिनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली होती. ग्रामपंचायत सरपंच दिपक फणसे, सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी, तलाठी व कार्यालयातील कर्मचारी, सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थांनी एकत्रित येत किनाऱ्यावरील कचरा वेचून किनारा स्वच्छ केला. ग्रामपंचायत, अन्य सर्व शासकीय कार्यालये, शाळा, ग्रामस्थांनी एकत्रित येत स्वच्छता उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

मांडवी किनारपट्टी स्वच्छतेसाठी जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानचा सहभाग

मांडवी किनाऱ्याच्या स्वच्छता उपक्रमात नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थाननेही सहभाग नोंदविला. विविध गावातील १५० अनुयायी उत्स्फूर्तरित्या स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले होते. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे किनारपट्टी स्वच्छता अभियानात लांजा, पावस, वरवडे येथील संस्थानाचे १५० अनुयायी सहभागी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 17/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here