युक्रेन संघर्ष आता थांबवा, पंतप्रधान मोदींचं पुतीन यांना आवाहन

0

समरकंद : सध्याचे युग हे युद्धाचे नाही असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील संघर्ष आता संपुष्टात आणा, असे आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना केले आहे.

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (एससीओ) यंदाची वार्षिक परिषद उझबेकिस्तानमधील समरकंद शहरात आयोजिण्यात आली आहे. त्या परिषदेला उपस्थित असलेल्या मोदी व पुतीन यांची शुक्रवारी भेट होऊन त्यांच्यात सुमारे पन्नास मिनिटे चर्चा झाली.

मोदी यांनी पुतीन यांना सांगितले की, जागतिक स्तरावर अन्न व ऊर्जा सुरक्षेसंदर्भात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अन्नसुरक्षा, इंधन, खते आदींचा मोठा प्रश्न विकसनशील देशांसमोरही उभा राहिला आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. पुतीन यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. त्यावर पुतीन यांनी मोदींना सांगितले की, युक्रेनच्या संघर्षाबद्दल भारताला वाटणाऱ्या चिंतेविषयी मला कल्पना आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात यावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. रशियाही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. रशियाबरोबर चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास युक्रेनने नकार दिला आहे. त्यांना लढाईच्या माध्यमातूनच आपली उद्दिष्टे साध्य करायची आहेत. युक्रेनमध्ये जे घडत आहे, त्याची सारी माहिती रशिया सर्वांना वेळोवेळी देईल, असेही पुतीन म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 17/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here