रूग्णवाहिकेतुन मृतदेह गावी आणणाऱ्या ‘त्या’ मुंबईकरांची रवानगी विलगीकरण कक्षात

0

राजापूर : मुंबईतुन अणसुरे येथे रूग्णवाहिकेने मृतदेह घेऊन आलेल्या चार मुंबईकरांना प्रशासनाकडून आडिवरे येथील विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. पाच दिवसांसाठी त्यांना या कक्षात ठेवले जाणार असून त्यानंतर पुढील नऊ दिवसांसाठी त्यांना त्यांच्या गावी होम क्वारंटाईन केले जाणार आहे. तालुक्यातील अणसुरे येथील महिलेचा वृद्धापकाळामुळे मुंबई येथे मृत्यू झाला होता. त्यांचे चार नातेवाईक मुंबई येथून प्रशासनाची लेखी परवानगी घेऊन महिलेचा मृतदेह रूग्णवाहिकेतून घेऊन गावी येत होते. ही बातमी समजताच अणसुरे ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिस पाटील यांच्या माध्यमातून पोलिस आणि आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला. ग्रामस्थांकडून योग्य अंतर राखत मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडीतील त्या चाकरमान्यांना आडिवरे येथे तयार केलेल्या विलगीकरण कक्षात नेले. अणसुरेच्या सरपंच शीतल पंगेरकर, उपसरपंच रामचंद्र कणेरी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत, पोलिस पाटील रसाळ, आरोग्य पर्यवेक्षक तावडे, पत्रकार राजन लाड आदी सातत्याने नातेवाइकांच्या आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here