ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्यावर आज अंत्यसंस्कार

0

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

HTML tutorial

त्यांचं पार्थिव लंडनमधील किंग जॉर्ज चतुर्थ मेमोरियल चॅपलमध्ये दफन करण्यात येईल. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख आणि दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी वेस्टमिन्स्टर हॉलला भेट देत महाराणींचं अंत्यदर्शन घेतलं.

महाराणी एलिझाबेथ यांचं 8 सप्टेंबर रोजी निधन
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्यानंतर मंगळवारी त्यांचं पार्थिव 13 सप्टेंबर रोजी इंग्लंडमध्ये दाखल झालं. त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिन्स्टर हॉलला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर आज 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रात्री 12 वाजता शाही कुटुंब महाराणीला कायमचा निरोप देईल आणि महाराणी एलिझाबेथ यांना त्यांचे पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारील समाधीमध्ये दफन करण्यात येईल.

जगभरातील दिग्गजांची हजेरी
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. यादरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जगभरातील विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, प्रतिनिधी लंडनला पोहोचले आहेत. रविवारीच महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो लोक जमले होते. ही गर्दी आज आणखी वाढू शकते.

अंत्यदर्शनासाठी 8 किलोमीटरहून अधिक लांब रांग
मीडिया रिपोर्टनुसार, महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यदर्शनासाठी आठ किलोमीटरहून अधिक लांब रांग लागली आहे. यामध्ये दर तासाला सुमारे 4000 लोक राणीचे अंतिम दर्शन घेत आहेत. राणीचे पार्थिव सध्या संसदेच्या वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. आज त्यांचे पार्थिव येथून बाहेर काढल्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू होणार असून नियोजित वेळापत्रकानुसार त्यांचा मृतदेह दफन करण्यात येईल.

अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला शेकडो राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे देखील उपस्थित राहणार आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी ब्रिटनमध्ये अंत्यसंस्कार होणार असून, त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हेही एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 19/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here