अटक केलेला चोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह; पोलीस, न्यायमूर्ती क्वारंटाईन

0

पंजाब : चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एक चोर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. चोराला सध्या रुग्णालयात दाखल केले असून त्याला अटक करणारे सात पोलीस व ज्यांच्यासमोर त्याची सुनावणी झाले ते न्यायमूर्ती यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पंजाबमधील लुधियाना शहरात हा प्रकार घडला आहे. या दोन चोरांनी त्यांच्या एका साथीदारासोबत मिळून एका घरात चोरी केली होती. त्यानंतर ते पळून जात असताना लॉकडाऊनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. मात्र त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलिसांसमोर त्यांना हजर केले असता त्यातील एक जण जोरजोरात खोकला. त्याला खोकताना पाहून न्यायमूर्तींना त्याची तात्काळ कोरोना चाचणी करायला सांगितली. त्या चोराची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलीस, न्यायमूर्ती, त्याचा साथिदार सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या तिसऱ्या साथिरादाराचा शोध सुरू आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here