रत्नागिरीत भूमिगत वीज वाहिनी टाकण्याच्या ९४ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

0

रत्नागिरी : शहरातील वीज वाहिन्या भूमीगत टाकण्यासाठी महावितरणने तब्बल ९४ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून या कामासाठी महावितरणकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना विनाखंडीत वीज सेवा मिळावी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी म्हणून रत्नागिरी शहरातील वीज वाहिन्या भूमिगत टाकण्याचा प्रस्ताव महावितरणने तयार केला. कोस्टल झोनमधील तीन शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी शहरासह पालघर आणि अलिबाग या शहरांचा समावेश आहे. केंद्राच्या नॅशनल सायक्लॉन रिस्क मेटीगेशन प्रोजेक्ट (एनसीआरपीएम) या अंतर्गत ही योजना राबवण्यात येणार आहे. कोकण परिमंडळ विभागाने भूमीगत वीज वाहिन्यांसाठीचा प्रस्ताव तयार करून महावितरणच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी सादर केला. मुख्य कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राच्या उर्जा खात्याकडे पाठवण्यात आला. केंद्राच्या मान्यतेनंतर पायाभूत योजनांसाठी निधी या योजनेअंतर्गत महावितरणचे पॉवर फायनान्स कार्पोरेशनने या प्रस्तावासाठी आवश्यक निधीची तरतुद केली आहे. या कामासाठी महावितरणने निविदा प्रक्रिया मागवली आहे. लवकरच ठेकेदार निश्चित करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here