दुचाकी दिली नाही म्हणून भावाने केले धारधार चाकूने वार

0

चिपळूण : लॉकडाऊनच्या काळात दुचाकीत पेट्रोल नसल्याने गाडी देण्यास नकार देणाऱ्या भावावर दारूच्या नशेत धारधार चाकूने वार करत ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सागर पोपट चव्हाण रा. दादर देवकुळवाडी ता. चिपळूण याच्यावर अलोरे शिरगाव पोलीस स्थानकात भा. दं. वि. क. ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रवीण पोपट चव्हाण हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्या मानेवर डाव्या बाजूला वार करून संशयित आरोपीने दुखापत केली आहे. मोटार सायकलीची चावी देत नाही या किरकोळ कारणावरून राग आल्याने दारूच्या नशेत आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here