महिलेची ऑनलाईन फसवणूक करत घातला ८७ हजारांचा गंडा

0

रत्नागिरी : पेटीएमला केवायसी सेवा अपडेट नसल्याचा मेसेज करीत क्विक सपोर्ट अॅप ओपन करण्यास सांगून त्यावर आलेला आयडी नंबर विचारून सारस्वत बँक व बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तब्बल ८७,०१० इतकी रक्कम फसवणूक करून काढून घेतल्याची तक्रार मंजिरी अरविंद घोलकर रा. राधेय मनाली अपार्टमेंट, हॉटेल कार्निव्हल जवळ, ता. रत्नागिरी या महिलेने पोलिसात दिली आहे. आरोपीने ९०९१२२५९६९ या नंबरवरून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला होता. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात भा. दं. वि. क. ४२० प्रमाणे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here