कोरोनाने जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. कोरोना रोगावर आपण नियंत्रण मिळवू पण नंतर आपल्याला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यायचं आहे, अशी आठवण करून देत अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी भारत सरकारने जीडीपीच्या 100 टक्के कर्ज काढावं, असं मत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं आहे. इथून पाठीमागे आपण देशाच्या जीडीपीच्या 70 टक्के इतकं कर्ज काढत आलो आहोत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता अर्थव्यवस्थेला जर पुन्हा रूळावर आणायचं असेल तर आपल्याला काही धाडसी पावलं टाकणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
