रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून आंबा शेतकऱ्यासाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून 50 टक्के अनुदानासह राज्य शासनाने हमी भावाने आंबा खरेदी करून विक्री करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी दिला आहे.
