”तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेऊ” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

महाराष्टातलं लॉकडाउनला हे ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी प्रत्येकाने अजुनही घरात बसायला हवं. आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. केवळ नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. काही ठिकाणी लॉकडाऊनची बंधने कठीण करावी लागतील. कोरोनाचे युद्ध आपण जिंकणारच असल्याचं ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे किती दिवस चालणार असं अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेल की जितकी आपण शिस्त पाळाल तितका तो लवकर संपेल. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेऊ, असं म्हणत दरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचं आहे या सुचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलणार असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:46 PM 11-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here