नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी संचलित लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयतर्फे परप्रांतिय कामगारांना मदतीचा हात

0

दोडामार्ग : लॉकडाऊनमुळे अनेक कामगार दोडामार्ग शहरात अडकले आहेत. हाताला काम नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे, नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या लक्ष्‍मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्गच्या प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी मदतीचा हात देत त्यांना तांदूळ, तूरडाळ, तेल, मसाले इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी प्राचार्य डॉ. दरेकर, प्रा. डॉ.गाथाडे, श्री मोरे, प्रा. डॉ. जाधव, प्रा. डॉ. ढेपे, प्रा. प्रसादी आदि उपस्थित होते. मदत करताना शासनाच्या सूचनांचे कडेकोट पालन करावे, सोशल डिस्टन्स ठेवावे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोविंड १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना सामाजिक बांधिलकी राखून इतरही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी अशा प्रकारची मदत आपापल्या गावात अडकून पडलेल्या व्यक्तींना करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दरेकर यांनी यावेळी केले. हळबे महाविद्यालय, दोडामार्ग हे नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कार्य करत असते. यापूर्वीही अशा प्रकारच्या प्रकारची मदत अनेक वेळा महाविद्यालयाने समाजासाठी केलेली आहे. महाविद्यालय दोडामार्ग तालुक्यामध्ये नेहमीच शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत असते. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक दोडामार्गचे तहसीलदार मोरेश्वर हाडके यांनी केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. अभिजीत हेगशेट़ये यांच्या मार्गदर्शनाखाली असे उपक्रम महाविद्यालय नेहमीच राबवित असते. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दरेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:00 PM 11-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here