पश्चिमी देशांना रशियाला नेस्तनाबूत करायचंय, पुतीन यांचा गंभीर आरोप; दिला इशारा..

0

युक्रेन रशिया युद्ध सुरु असतानाच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज पुन्हा देशात लष्करी जमावाचे आदेश दिले.

HTML tutorial

एकीकडे पश्चिमी देश रशियाला धडा शिकवण्याचा आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पुतीन यांनी केला आहे. त्यामुळे इतर देशांनी मर्यादा ओलांडली असल्याचे सांगत इतर देशांनाही त्यांनी इशारा दिला आहे.
युक्रेन

आणि रशियादरम्यान चाललेल्या युद्धामुळे अनेक बातम्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत.यावरच रशियन न्यूज एजन्सीकडून पुतीन यांचे युद्धसंदर्भात मत छापताना म्हटले आहे की, पश्चिमी देश रशियाला वेगळे करण्याची आणि तोडण्याची भाषा करत आहेत.

मात्र देशातील नागरिकांसाठी आणि देशाच्या सुरक्षित भविष्यसाठी आम्ही ही पावले उचलत असल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे विशेष लष्करी मोहिमेचे ‘युक्रेन जंग’ हे ध्येय आम्ही सोडलेलेच नाही.

मात्र युक्रेनच्या लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक (एलपीआर) ला मुक्त करण्यात आले आहे आणि डोनत्स्क पीपल्स रिपब्लिक डीपीआर (डीपीआर) देखील अंशतः मुक्त केले असल्याचे पुतीन यांनी स्पष्ट केले होते.

युक्रेन-रशिया युद्धासंदर्भात व्लादिमीर पुतीन यांच्याकडून अनेक नवनवे निर्णय घेतले जात आहेत. एकीकडे हे युद्ध सुरु असतानाच त्यांनी पश्चिमी देशांना इशारा दिला की जर प्रादेशिक अखंडतेच्या प्रश्नामुळे प्रादेशिक अखंडतेला धोका येत असेल तर रशिया सगळ्या मार्गांचा वापर करणार आहे.

त्यामुळे आता पुतीन यांनी आपल्या देशाच्या लष्करी आघाडीच्या आदेशावरही स्वाक्षरी केली आहे आणि ती आजपासूनच अंमलात आणली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रशियाचे संरक्षणमंत्री म्हणाले की, 3 लाख राखीव सैनिक आता देशात तैनात केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

युक्रेन डोनाटस्क आणि लुहानस्कची दोन शहरं ही रशियाचाच भाग बनविली गेली आहेत. त्यासाठी शुक्रवारपासून मतदान केले जाणार आहे.

पुतीन यांनी फेब्रुवारीमध्ये युद्ध करण्यापूर्वी युक्रेनची ही दोन शहरं स्वतंत्र क्षेत्रं म्हणूनही घोषणा करण्यात आली आहे. आता डोनत्स्क, लुहानस्क, खेरसन आणि अंशतः रशियामध्ये झापोरिझिया प्रदेशातील झापोरिझिया प्रदेशातही शुक्रवारपासून सार्वमत जाहीर करण्यात आले आहे.

पूर्व युक्रेनमध्ये, रशियाच्या सीमेवरील डोनाटस्कला एकदा युक्रेनमधील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र म्हणून मानले गेले आहे. हे डोनबास मुख्य शहर असून या शहरात महत्त्वपूर्ण खनिजांचेही साठे आहेत.

हे शहर युक्रेनच्या मोठ्या स्टील उत्पादक केंद्रांपैकी एक असून या शहराची लोकसंख्या सुमारे 20 लाखापर्यंत आहे. त्याचवेळी, पूर्वी व्होरोसिलोव्हग्राड म्हणून ओळखले जाणारे लुहानमस्क हे मात्र युक्रेनसाठी एक कोळशाचा एक महत्त्वाचा साठा मानले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:56 PM 21/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here