रत्नागिरी : सध्या कोरोना विरूद्धच्या युद्धात रस्त्यावरची लढाई पोलीस सचोटीने लढत आहे. मात्र, जवळपास अर्धा एप्रिल संपत आला तरी पोलीसांचे पगार अद्याप झालेले नाहीत. सरकारनं मार्च महिन्याचा पगार दोन टप्यांत देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे सरकार पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पूर्ण पगार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, शासन निर्णयात त्याचा उल्लेख नसल्यानं पोलीसांच्या पगाराबाबतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 1400 पोलीस आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्याने या महिन्याचं बजेट कसं सांभाळायचं. कारण, 10 तारीख उलटून चाललीये. मात्र, पोलीसांच्या पगाराचं नाव नाही. मिळणारा पगारही पूर्ण मिळेल का?, याबद्दलही शाश्वती नाही. तरीही हे सर्व बाजूला सारून पोलीस यंत्रणा आपल्या कर्तव्यामध्ये दक्ष असल्याचे दिसून येत आहे.
