राजीवडा, साखरतरवर ड्रोनची नजर

0

रत्नागिरी : राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 किमी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या भागात जमावबंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी या दोन्ही ठिकाणांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. साखरतरमध्ये 2 तर राजीवडा येथे एक असे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राजीवडा आणि साखरतर शहरातील दोन्ही कंटेनमेंट झोन वर प्रशासनाकडून ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जात आहे. नागरिकांनी कृपया घरीच राहून आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जर कोणी कायदा मोडून बाहेर फिरताना दिसलं तर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here