मोदी सरकारकडून ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांना थेट सहाय्य

0

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. कोरोनामुळे अनेक गरीब वर्गाचे मोठे हाल झाल्याचं दिसून येत आहेत. कोरोनाच्या या संकटादरम्यान पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या चालू आर्थिक वर्षात १५ हजार ८४१ कोटी निधी केंद्र सरकारने जमा केला आहे. कृषी मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे. या योजनेतंर्गत उच्च उत्पन्नातील शेतकऱ्यांना वगळता सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६ हजार रुपये हे तीन टप्प्यात दिले जातात. २ हजार रुपयांचे तीन टप्पे वर्षभरात होतात.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here