अमेरिकेत कोरोनाचा कहर; 24 तासांत मृतांचा आकडा तब्बल 2108 वर

0

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,02,842 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 17,03,002 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,77,082 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 2108 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 503,177 झाली असून आतापर्यंत 18,761जणांचा मृत्यू झाला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here