आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदीत कोसळला

0

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरुन रसायनवाहू कंटेनर नदी कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडली.

HTML tutorial

या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

हा कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने रसायन घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. पुलावरुन नदीत कोसळलेल्या कंटनेरमधील एकाचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अपघातग्रस्त कंटेनरच्या केबिनखाली एकजण अडकल्याची भीती व्यक्त होत असून, या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

लांजातील आंजणारी पुलादरम्यान अपघातांचे प्रमाण वाढले असून, याठिकाणी योग्यती सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here