भारत पेट्रोलियम गॅसचा टँकर आंजणारी पुलावरून नदीत कोसळला; चालक मृत्युमुखी

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथील पुलावरून भारत पेट्रोलियचा गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

HTML tutorial

प्रमोद जाधव (राहणार- उस्मानाबाद) असे मयत चालकाचे नाव आहे. प्रमोद जाधव हा टँकर क्रमांक MH-12LT-6488 घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने चालला होता. अंजनारी येथील उतार उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर नदीत कोसळला. त्यामुळे चालकाचा बुडून मृत्यू झाला.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने मयत चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोच केले. काही काळ महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. हातखंबा येथील वाहतूक शाखेचे पोलीस, लांजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:23 PM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here