स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला सलग ८ व्या वर्षी राज्यस्तरीय गटात प्रथम क्रमांकाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान

0

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने दोन दिवसीय कार्यशाळा, दिपस्तंभ पुरस्कार वितरण व वार्षिक सभा असे आयोजन रत्नागिरी येथील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे केले होते. राज्य फेडरेशनच्या या कार्यक्रमास राज्यभरातून ६०० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन डॉ.सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे हस्ते करण्यात आले. या अभ्यास वर्गात डॉ.सोपान शिंदे, फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, ॲड.दीपक पटवर्धन, सनदी लेखापाल श्री. विशाल चव्हाण यांनी मार्गदर्शनपर सत्र घेतली.

राज्य फेडरेशनच्या दिपस्तंभ पुरस्काराचे वितरण दि.१९/०९/२०२२ रोजी ना. उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र शासन यांचे हस्ते करण्यात आले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सलग आठव्यांदा दिपस्तंभ पुरस्कार संस्थेचे वतीने स्वीकारला. राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कारात प्रथम क्रमांकाने स्वरूपानंद पतसंस्थेला गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातला ४०% लोकसंख्येचा सहभाग आणि १ लाख कोटींच्या घरात ठेवी असलेली ही चळवळ अत्यंत प्रभावी आहे. या चळवळीचे महत्त्व मी जाणतो तसेच पतसंस्थांचा प्रभाव किती असतो याची जाणीव आपल्याला आहे असे सांगत पतसंस्थांचे वकीलपत्र स्वीकारून पतसंस्थांचे मुख्य प्रश्न मा. मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करून तात्काळ सोडवू असे सांगत आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात पतसंस्थे माध्यमातूनच झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोकणात सहकार नाही असे म्हणणाऱ्यांना ॲड.दीपक पटवर्धन यांनी स्वरूपानंद सहकारी संस्थेचे माध्यमातून आदर्श काम उभं करत स्पष्ट उत्तर दिल आहे.असे ना. सामंत म्हणाले. सहकारात राजकारण नाही १००% अर्थकारण हाच फॉर्म्युला योग्य असल्याचे ना.सामंत म्हणाले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला सलग आठव्या वर्षी राज्य फेडरेशनचा दिपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला. १०० कोटी व त्यापुढील ठेवींच्या गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वरूपानंद पतसंस्थेला प्राप्त झाला. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी ॲड.दीपक पटवर्धनांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेबद्दल गौरवद्गार काढले. राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी आवर्जून स्वरूपानंद पतसंस्थेला भेट द्यावी. व त्यांचे आदर्श कामकाज पहावे असे आवाहन पतसंस्था प्रतिनिधींना केले.

२५९ कोटींच्या ठेवी, १६९ कोटींची कर्जे, ९९% वसुली, १३३ कोटींची गुंतवणूक, ३८ कोटींचा स्वनिधी, १७ शाखांच्या माध्यमातून ४० हजार सभासदांच्या सहभागाने चाललेले हे सातत्यपूर्ण अर्थचक्र आहे असे सांगत पतसंस्थेला प्राप्त झालेल्या पुरस्काराबाबत अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया ॲड.दीपक पटवर्धन यांनी नोंदवली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:37 PM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here