”शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची शेवटची धडपड सुरु”

0

मुंबई : शिवसेनेतून 40 आमदार आणि 12 खासदार निघून गेले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेत फार नेते शिल्लक नाहीत. जे काही नेते उरले आहेत ते सुद्धा निसटत आहेत.

HTML tutorial

त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रक्षोभक भाषण करत आहे. त्यांची शिवसेना वाचवण्यासाठी शेवटची धडपड सुरु आहे, अशी टीका ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

एका महिन्यात निवडणुका घेणं शक्य नाही. उद्धव ठाकरे कालच्या मेळाव्यात आक्रमक होत बोलत होते. मात्र त्यांनी त्यांची जागा बघायला हवी. शिवसेनेचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना टिकवण्याची त्यांची ही शेवटची धडपड सुरु आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर ते शेवटच्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे त्यांनी आता टीका करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करायला हवं, असा टोला देखील त्यांनी लगावला.

मला ही तिकीट मिळायची खात्री वाटत नाही!

काँग्रेसच्या काळात गाई-वासरु उभं केलं तरी निवडून यायचे. आता परिस्थिती बदलली आहे. मेहनत आणि काम केल्याशिवाय निवडून येणं कठीण झालं आहे. मला पण आता भीती वाटते. भविष्यात मला ही तिकीट मिळेल का नाही, याची खात्री नाही. कारण सध्या काम आणि मेरिट पाहिलं जात आहे.

विधानभवनातच गुटखा विक्रीचं उल्लंघन…
मी एकदा गाडीतून जात होतो. तेव्हाच एसटीच्या खिडकीतून एकाने तोंड बाहेर काढलं आणि पिचकारी मारली. ती पिचकारी थेट आमच्या गाडीच्या काचेवर आली. चालकाला पुढचं काहीच दिसत नव्हतं. पिचकाऱ्या मारायची जणू स्पर्धाच लागते, असं म्हणत विधानभवनातच गुटखा विक्री बंदीचं उल्लंघन होत असल्याची कबुली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी दिली. विधिमंडळाच्या इमारतीत गुटखा आणि तंबाखू सर्रास खाल्ली जात असल्याचं आणि भिंतीच्या कोपऱ्यात पिचकाऱ्या मारल्या जात असल्याचं जाहीर भाषणात सांगितलं. माणिकचंद, विमल, तंबाखू खाल्ले जातात. महामार्गावरुन जाताना खिडकीतून तोंड बाहेर काढून चालक आणि प्रवासी पिचकाऱ्या मारतात. महाविद्यालयात ही अशीच परिस्थिती दिसते. कोण लांब पिचकारी मारतो अशी स्पर्धाच लागते. हीच परिस्थिती विधिमंडळ इमारतीत ही असते. इमारतीच्या कानाकोपऱ्यात गुटखा आणि तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारल्या जातात. त्यामुळे प्रत्येक चार महिन्यांच्या अधिवेशनापूर्वी रंगरंगोटी करावी लागते, असं म्हणत थेट गुटखा विक्री कायद्याचं उल्लंघन विधिमंडळात होत असल्याची कबुलीच मंत्री गिरीश महाजनांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:43 PM 22/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here