मांजर आडवे येऊन झालेल्या दुचाकी अपघातात महिला गंभीर जखमी

0

रत्नागिरी : शहरा जवळील खेडशी येथे असणाऱ्या आकाशवाणी केंद्राच्या मागील रस्त्यावर आज दुपारी ४ च्या सुमारास एक अपघात झाला.

HTML tutorial

या दुचाकी अपघातात मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. मुलाच्या शाळेतून परतत असताना हा दुचाकी अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार राजेश सावंत व अनामिका सावंत हे दोघे पतीपत्नी आपल्या मुलाच्या शाळेतील मिटिंग आटपून घरी परतत होते. घर अगदी हाकेच्या अंतरावर असताना अचानक दुचाकीच्या आडवे मांजर आले. म्हणून पत्नी राजेश यांनी गाडीला ब्रेक लावला. याचवेळी मागे बसलेली पत्नी अनामिका हिचा तोल जाऊन टी खाली कोसळली. या अपघातात अनामिकाच्या डोक्याला मार लागून कानातून रक्त येऊ लागले. तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनामिका या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. अवघ्या दोन दिवसानावर त्यांच्या मुलाचा वाढदिवस देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here