जिल्हा रास्त धान्य दुकानदार संघटनेची आज वार्षिक सर्वसाधारण सभा

0

रत्नागिरी : जिल्हा रास्त धान्य दुकानदार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिपळूणजवळ कापसाळ येथील बाळासाहेब माटे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. सभेत मागील सभेच्या इतिवृत्तातील सर्व विषयांसह शासनमान्य रास्त धान्य दुकाने चालवताना येणाऱ्या अडचणी, इंटरनेटअभावी चालत नसलेल्या पॉस मशीन, अनेक वर्षे झाल्याने त्या बंद पडत असल्याने बदलून मिळाव्यात, कमिशन वेळेत मिळावे, करोनाच्या काळात जीव गमावलेल्या दुकानदारांच्या वारसांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी आदी मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात शासन आणि संबंधित मंत्र्यांना निवेदने देऊनही दखल घेतली जात नसल्याने यावर ठोस निर्णयही घेतला जाणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासदांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 AM 23/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here