पूर परिस्थितीमुळे इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदत वाढ द्या- अॅड. दीपक पटवर्धन यांची जिल्हाधिकारीयांना विनंती

0

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रकियेस मुदत वाढ द्यावी,अशी विनंती भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी यांना केली.

कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे येथील नद्यांना पुर आला आहे. कोकणातील चिपळुण, संगेमश्व र, खेड, लांजा, राजापुर या भागांतील विद्यार्थ्यांना तसेच पुणे, कोल्हापुर, सातारा येथे इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. परंतु कोकणासह पश्चिाम महाराष्ट्रात पुर सदृश्यपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे रस्ता वाहतुक, रेल्वे वाहतुक बंद आहे. अनेक ठिकाणी रस्तेही खचले आहेत.

विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याची तारीख ७ व ८ ऑगस्ट २०१९ अशी आहे. पंरतु पुरसदृश्य परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना संगणकीय विहीत प्रणालीद्वारे किंवा तेथील महाविद्यालयात जाऊन आपले अर्ज भरु शकत नाहीत. यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते. अशा सर्व विद्यार्थ्यांनी भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धनयांना विनंती करुन अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्राच्या प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत वाढ करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमाबरोबरच इतर अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील प्रवेश प्रक्रीयेतील पुढील टप्प्यातील प्रवेश प्रक्रीयेस विद्यार्थ्यांना मुदत वाढ द्यावी, अशी विनंती लेखीपत्राद्वारे मा.जिल्हाधिकारी यांना केलीआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here