रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील मदिना बेकरी या दुकानावर धाड टाकण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईत मुदत संपलेला 510 किलोचा वनस्पती डालडा जप्त करण्यात आला आहे.
औरंगजेब चौधरी यांची ही मदिना बोकरी आहे. या बेकरीत कालबाह्य झालेला 510 किलोचा डालडा सापडला. तसेच बेकरीतील टोस्टवर बनविल्याची तारीख किंवा मुदतीची तारखेचे लेबल लावले नव्हते. या टोस्टची अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ विल्हेवाट लावली. या कारवाईची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दिनानाथ शिंदे यांनी दिली.
ते म्हणाले की, मदिना बेकरी मध्ये प्रचंड अस्वच्छता होती. कामगारांचे कपडे अस्वच्छ होते. बेकरीत स्वच्छता केल्याशिवाय बेकरी सुरू करू नये, अशा सक्त सूचना दिल्या असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 23/Sep/2022