रांगोळी स्पर्धेत सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या तनिष्का भिसेचा द्वितीय क्रमांक

0

रत्नागिरी : आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल रत्नागिरीच्या तनिष्का ऋषी भिसे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिचे शिरगाव केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले.

देशभरात सर्वत्र आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीत विविध संस्थांनी त्यामध्ये पुढाकार घेतला होता. शिरगाव केंद्राच्या अंतर्गत येणार्‍या माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल रत्नागिरीच्या तनिष्का ऋषी भिसे या विद्यार्थीनीने आकर्षक रांगोळी काढून परिक्षकांची वाहवा मिळवली. तनिष्का हिने द्वितीय क्रमांक पटकावला. नुकताच पंचायत समिती शिक्षण विभाग रत्नागिरी केंद्र शिरगाव यांच्यावतीने बक्षिस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तनिष्का हिला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:59 PM 23/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here