ऑरेंज झोनमधील समावेशामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित

0

रत्नागिरी : राज्यात करोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये होण्याची शक्यता असल्याने रत्नागिरी जिल्हावासीयांच्या आशा संचारबंदी शिथिल होण्याच्या शक्यतेने पल्लवित झाल्या आहेत.

IMG-20220514-WA0009

करोनाचे १५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोन, त्यापेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज झोन आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोनमध्ये समाविष्ट होतील. भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संचारबंदीचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. याच संवादात करोना रुग्णसंख्येनुसार शहरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्राने दिले. येत्या एक-दोन दिवसात केंद्राकडून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे श्री. टोपे यांनी स्पष्ट केले.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. या झोनमध्ये येणार्याो जिल्ह्यांच्या सीमा बंद करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा झाली. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले. त्यामुळे येत्या १५ एप्रिलपासून रत्नागिरी जिल्ह्यातील काही उद्योग सुरू होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here