चिखली गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार : आमदार शेखर निकम

0

चिपळूण : चिखली (संगमेश्वर) गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी देणार, अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी चिखली गावभेट दौऱ्याप्रसंगी दिली. यावेळी चिखली ग्रामपंचायततर्फे आमदार निकम यांचा सत्कार करण्यात आला.

तर उपसरपंच ममता साळुंखे यांना तालुकास्तरीय माता रमाई पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी विविध विकास कामांची मागणी आमदार शेखर निकम यांच्याकडे केली. यामध्ये विशेषत: चिखली कडवई रस्त्याची प्रमुख मागणीसह चिखली ब्रीज, बीएसएनल टॉवर, रांगव धरणाच्या कालव्यासाठी जमिन दिलेल्या ग्रामस्थांचे प्रश्न, एस. टी. समस्या, चिखली मोहल्ला रस्ता, चिखली ग्रामदेवता मंदिर ‘क वर्ग पर्यटन’मध्ये समाविष्ट करणे, चिखली मोहल्ला कब्रस्तान पाखाडी अशा विविध विकास कामांची निवेदने ग्रामस्थ्यांद्वारे देण्यात आली. चिखली कडवई रस्ता शासनाच्या बजेट कार्यक्रमांतर्गत मंजूर झालेला आहे व उर्वरित विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांना आमदार निकम यांनी आश्वासित केले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, माजी पं. स. सदस्या प्रेरणा कानाल, सरपंच मैथिली कानाल, उपसरपंच ममता साळुंखे, कडवईचे उपसरपंच दत्ता ओकटे, मासरंग सरपंच राजेंद्र ब्रीद, संतोष भडवळकर, राजू पाध्ये, ग्रा. स. शिवानी लाखण, सचिन कदम, रसिका पाले, दिलीप मादगे, पोलिस पाटील रुपेश कदम, लक्षमण(बावा) मयेकर, रोहिदास मयेकर, लिलाधर पंडित, साजिदा मुल्लाजी, रमेश डिके, विनोद कदम, धर्मेंद्र मोहिते, अथर्व पंडीत, संजय खातू, संजय कानाल, तुरळ ग्रा. स. संतोष जाधव, तुरळ माजी सरपंच सहदेव सुवरे, हरिश्चंद्र मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here