श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडचे आयोजन

0

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे सलग दहाव्या वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे (रत्नागिरी) शहर व आसपासच्या पंधरा-वीस गावांतील धारकऱ्यांची श्री दुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत आयोजित केली आहे.

दौड काढताना दररोज एका सार्वजनिक मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले जाते. २०१२ पासून ही दौड दरवर्षी काढण्यात येत असून या दौडमध्ये हातखंबा, निवळी, खेडशी, कारवांचीवाडी, पाली, कसोप, फणसोप, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, शिरगाव, पावस, मावळंगे, कोळंबे दौडचे उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दौडमध्ये खंड पडला होता. मात्र यंदा दिमाखात व मोठ्या संख्येने पुन्हा दौड काढण्यात येणार आहे.

गेली अनेक वर्षे या उपक्रमाला शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत असून या वर्षीची दौड नवरात्रौत्सवाच्या शुभारंभाच्या दिवशी २६ सप्टेंबरला सुरू होईल आणि ५ ऑक्टोबरला या दौडची सांगता होणार आहे. दौड काढल्यानंतर यामध्ये शहर व शहरालगतच्या गावांतील शिवप्रेमी, धारकरी, हिंदु, देशभक्त बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राकेश नलावडे व धारकऱ्यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी मृत्यूचा मुखात राहून निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य हे केवळ जगद्जननी श्री तुळजाभवानीच्या आशीर्वादाने उभं राहू शकलं. दुर्गादेवीजवळ तेच आशिर्वाद पुन्हा मागण्याची परंपरा म्हणजे ‘श्री दुर्गामाता दौड’. भारतमातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणारी शिवशंभू रक्तगटाची व राष्ट्रभक्तांची अवघी तरूण पिढी घरोघरी उत्पन्न व्हावी, देव, देश आणि धर्मरक्षणाच्या, राष्ट्राच्या, संस्कृतीच्या, सत्व स्वाभिमानाच्या बाबतीत निद्रिस्त होत चालेलल्या हिंदु समाजाने खडबडून जागे व्हावे, यासाठी ‘श्री दुर्गामाता दौड’चे आयोजन केले आहे. या स्फूर्तीदायक, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्मभक्ती बिंबवणाऱ्या उपक्रमात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राकेश नलावडे यांनी केले आहे.

दुर्गामाता दौडचे वेळापत्रक
एकत्र येण्याचे ठिकाणा मारुती मंदिर सकाळी ०५:४५ वाजता
दि. २६ मारूती मंदिर, माळनाका, के. सी. जैन नगर, एकता मार्ग, मारुती मंदिर. देवी- श्री व्याघेश्वरी अंबा माता मंदिर.
दि. २७ – मारूती मंदिर, मजगांव रोड, चर्मालय, क्रांतीनगर, स्टेट बॅंक कॉलनी, मारुती मंदिर. देवी- क्रांतीनगर नवरात्र उत्सव मंडळ, महापुरूष मित्रमंडळ आणि समता नवरात्र उत्सव मंडळ.
दि. २८- मारूती मंदिर, माळनाका, मनोरुग्णालय रोड, जेल रोड, सन्मित्रनगर, मारुती मंदिर. देवी- महापुरूष बाल मित्र मंडळ/पोलिस महापुरूष तरूण मित्र मंडळ
दि. २९ मारूती मंदिर, पॉवर हाऊस, विश्वनगर, पॉलिटेक्निकल रोड, मारूती मंदिर देवी- विश्वनगर मित्रमंडळ
दि. ३० मारूती मंदिर, अभ्युदय नगर, नाचणे रोड, साळवी स्टॉप, शिवाजीनगर, मारूती मंदिर- देवी श्री नवलाई देवी मंदिर, नाचणे
एकत्र येण्याचे ठिकाण : तेली आळी नाका, पाराजवळ (श्री महालक्ष्मी देवी) सकाळी ०५:४५ वाजता
दि. १ ऑक्टोबर- तेली आळी नाका, रामआळी, गोखले नाका, साई मंदिर, परटवणे, तेली आळी नाका. देवी- सत्य सेवा मंडळ/उत्साही तरूण मित्रमंडळ / गावडे दैवत सेवा नवरात्र उत्सव मंडळ.
दि. २ ऑक्टोबर- तेली आळी नाका, पऱ्याची आळी, विठ्ठल मंदिर, टिळक आळी, गणपती मंदिर, झाडगांव नाका, श्री देव भैरी सहाण, शेरे नाका, लक्ष्मीचौक, मारूती आळी, तेली आळी नाका. देवी- जोगेश्वरी मंदिर
दि. ३ ऑक्टोबर- तेली आळी नाका, आठवडा बाजार, भुते नाका, चवंडेवठार, तेली आळी नाका. देवी- जय भैरव नवरात्र उत्सव मंडळ/ नवरात्र उत्सव मंडळ घुडेवठार, तेली आळी मंडळ.
दि. ४ ऑक्टोबर- तेली आळी मंडळ, राम आळी, शहर पोलिस ठाणे, धनजी नाका, मच्छी मार्केट, झारणी रोड, तेली आळी नाका. देवी- राधाकृष्ण मंदिर/नवलाई मंदिर
एकत्र येण्याचे ठिकाण :- मारूती मंदिर, शिवतीर्थ वेळ पहाटे ५.४५ वाजता.
दि. ५ ऑक्टोबर- मारूती मंदिर (दुचाकीवरून), मांडवी रोड (दौड मार्ग)- राम मंदिर किल्ला, भागेश्वर मंदिर, भगवती मंदिर. देवी- श्री भगवती देवी मंदिर

अधिक माहितीसाठी : संपर्क: श्री. राकेश नलावडे (अध्यक्ष) 9822706923, श्री. गौरव सावंत 7057395969, श्री. देवेंद्र झापडेकर : 7020024242, श्री. जयदिप साळवी : 9922429577

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here