रत्नागिरी : फॉक्सकाँनला मंजुरी का दिली गेली नाही व वाढत्या महागाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयस्तंभ येथे रत्नागिरी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे झेंडे, फलक, झळकवण्यात आले होते. सरकार विरोधी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, महाराष्ट्र सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा सरचिटणीस कॅप्टन हनीफ खलीपे, महिला तालुकाध्यक्ष रिझवान शेख, शहर अध्यक्ष साईराज चव्हाण, रवींद्र खेडेकर, कल्पेश जाधव, कांचन माळगुंडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:02 PM 24/Sep/2022