कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेला दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर यासोबतच नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. अशी घोषणा काल (दि. १२) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणारच, असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने घेतलेला नाही. असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘कोरोना’मुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर भविष्यातील परीक्षा कशा घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी चार कुलगुरुंची कमिटी केलेली आहे. या कमिटीतून जी शिफारस येईल त्यानंतर यासंबंधी निर्णय होईल. मात्र सध्यातरी कुठल्याही परिस्थितीत महाविद्यालयीन परीक्षा होणार आहेत, असे स्पष्टीकरण श्री. सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:44 AM 13-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here