राजापुरात 10 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 4 अर्ज दाखल

0

राजापूर : पुढील महिन्यात होत असलेल्या दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपायला दोन दिवस शिल्लक असताना शनिवारपर्यंत केवळ वडदहसोळ ग्रामपंचायत निवडणकीत सरपंचपदासाठी एक तर सदस्य पदासाठी तीन असे चार अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे आता अखेरच्या दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे.

राजापूर तालुक्यात एकूण दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. यामध्ये सागवे, केळवली, वडदहसोळ, मोगरे, आंगले, मूर, देवाचेगोठणे, भालावली राजवाडी, कोंड्ये तर्फे सौंदळ यांचा समावेश आहे. थेट सरपंचपदासह सदस्यांची निवड करण्यासाठी या निवडणुकांचे मतदान पुढील महिन्यात (१३ ऑक्टोबर) रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे.

सुरुवातीचे दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. तिसऱ्या दिवशी वडदहसोळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी थेट सरपंचपदासाठी एक तर त्याच ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकसाठी तीन अर्ज सादर झाले आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस सलग सुट्ट्यांचे असून आता सोमवार, मंगळवार असे दोन दिवस शिल्लक राहिल्याने त्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची मोठी गर्दी उसळणार आहे.

अखेरच्या दोन दिवसांत किती उमेदवारी अर्ज सादर होतात, त्याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू असले तरी तालुक्यातील थेट सरपंच पदासहीत सदस्य निवड यासाठी पक्षांमधील स्पर्धा पाहता प्रत्यक्षात किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात, त्याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 26/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here