शिर्के हायस्कूल माळनाका येथे आज पाककला स्पर्धेचे आयोजन

0

परकार हॉस्पिटल, मराठी पत्रकार परिषदेचा संयुक्त उपक्रम

रत्नागिरी : परकार हॉस्पिटल, रत्नागिरी आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आई मी काय खाऊ… या विषयावर शिर्के हायस्कूल येथे पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आरोग्य सुरक्षा योजना या सुरक्षा योजनांची ४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून परकार हॉस्पिटल रत्नागिरी आणि मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज २६ रोजी आई मी काय खाऊ… या विषयावर पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

पाककला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खाऊ घरातूनच बनवून आणावा व रेसिपी सोबत लिहून आणावी. शिर्के हायस्कूलमधील रंजन मंदिरमध्ये सायंकाळी ४ ते ६ या दरम्यान ही स्पर्धा होईल.

अधिक माहितीसाठी डॉ. अनुराधा लेले (9075010661) आणि जान्हवी पाटील (8087943530) यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 26/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here