आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

0

रत्नागिरी : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा कोरे, प्रा. संदीप मुळ्ये, प्रा. स्वप्नाली झेपले उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, पंडित दीनदयाल उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायिभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ आणि तात्विक ग्रंथाच्या चिंतनातून त्यांनी एकात्म मानवतावादाचा सिद्धांत भारतीय समाजापुढे मांडला.

सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट आणि सामाजिक एकात्म मानवतावादाचे कार्य यांचा समावेश असणारी डॉक्युमेंटरी व्हॉट्स अॅप गटाद्वारे पाठवण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक महेंद्र पवार यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here