रत्नागिरी खबरदार महिला कमिटी आयोजित “गरबा नाईट” अवघ्या दहा मिनिटात “हाऊस फुल्ल”

0

रत्नागिरी : मागील दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे साजरा होऊ न शकलेला “गरबा नाईट” या वर्षी अवघ्या १० मिनिटात “हाऊस फुल्ल” झाला.

रत्नागिरी खबरदारच्या महिला कमिटीने फक्त महिलांसाठी या “गरबा नाईट” चे आयोजन केले आहे. दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळात हॉटेल व्यंकटेश, मारुती मंदिर रत्नागिरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या फक्त ४० महिलांनाच या “गरबा नाईट” मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. नामवंत गरबा प्रशिक्षक या कार्यक्रमात नृत्याचे प्रशिक्षण देखील देणार आहेत. शिवाय सहभागी महिलांना सूप, स्टार्टर, लज्जतदार पदार्थ यांची मेजवानी देखील रत्नागिरी खबरदार कडून दिली जाणार आहे. यासाठी फक्त २५० रुपये इतके नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात आले होते.

आज दुपारी या “गरबा नाईट” साठी प्रवेश नोंदणी सुरु झाली मात्र अवघ्या १० मिनिटातच प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने नोंदणी बंद करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:51 PM 26/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here