नवरात्रोत्सवासाठी रत्नागिरी एसटी आगारातर्फे नवदुर्गा दर्शन फेरी

0

रत्नागिरी : नवरात्रोत्सवासाठी रत्नागिरी एसटी आगारातर्फे आजपासून (दि. २७ सप्टेंबर) ४ ऑक्टोबरपर्यंत दररोज नवदुर्गा दर्शन फेरी सोडण्यात येणार आहे.

पावस येथील नवलाईदेवी, कशेळी येथील जाकादेवी, आडिवरे येथील महाकाली, वेत्ये येथील महालक्ष्मी, भालावली येथील आर्यादुर्गा, रत्नागिरीच्या रत्नदुर्गावरील भगवतीदेवी, जुगाई देवी, शिरगावचेी आदिष्टीदेवी, खेडशीची महालक्ष्मी आणि नाचणे येथील नाचणादेवी या ठिकाणांचे दर्शन इच्छुक भाविकांना घडविण्यात येणार आहे.

दररोज सकाळी रत्नागिरीतून सुटणार असलेल्या या एका फेरीचे भाडे ३०५ रुपये आहे. प्रवासातील भोजनाची व्यवस्था प्रवाशांनी स्वतःच करायची आहे.

नवदुर्गा फेरीविषयी अधिक माहितीसाठी वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप पाटील (७५८८१९३७७४) किंवा स्थानकप्रमुख सौ. भाग्यश्री प्रभुणे (९८५०८९८३२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 27/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here