रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ७ ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर येणार आहेत.
विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे कोकण दौऱ्यावर येणार त्याचा हा दौरा सहा दिवसांचा असणार आहे. ते कोल्हापुरातून तळकोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मनसे सौनिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दौऱ्यामध्ये राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 27/Sep/2022