गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू

0

पालघर : तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर m3 मधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विजय सावंत, समीर( पालघर)हे दोन कामगरांचा जागीच मृत्यु झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सध्या लॉकडाउनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी व संभाव्य मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here