रास्त दराच्या धान्य दुकानांमध्ये पुरेसा अन्नधान्य साठा उपलब्ध

0

रत्नागिरी : करोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर समाजातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी राज्य शासनातर्फे रास्त दराच्या धान्य दुकानांमधून पुरेसा अन्नधान्य पुरवठा केला जात आहे. तरीही अनेक ठिकाणी धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र अंत्योदय कार्ड, प्राधान्य गटातील कार्ड आणि केशरी कार्डधारकांना धान्यपुरवठा करण्यासाठी रास्त दराच्या प्रत्येक धान्य दुकानांमध्ये पुरेसे अन्नधान्य पाठविण्यात आले आहे. अन्नधान्याचा पुरेसा साठा शासनाकडे उपलब्ध असून तो रास्त दराच्या धान्य दुकानांमध्ये पोहोचविण्यात आला आहे. प्रत्येकाला तो दिला जाईल, अशी ग्वाही पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here