मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

0

खेड : खेड येथील मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचेवर दुसरा गुन्हा दखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान लकी लॉटरीसाठी पैसे जमा करून विजेत्यांना बक्षिसे वाटप केले. मात्र यावेळी जिल्हाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त यांची परवानगी न घेता पैसे गोळा केले असा आरोप करत मानवाधिकार जर्नालिस्ट असोसिएशनचे युवा जिल्हा अध्यक्ष अरबाज असगर बडे यांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज – वैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान दरवर्षी खेड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान भाविकांसाठी लकी ड्रॉ काढण्याची परंपरा असून नशीबवान भाविकांना, दुचाकी, फ्रिज, यासारखी पारितोषिके दिले जातात. गेली अनेक वर्षे लकी ड्रॉ चा खेळ सुरु आहे. मनसे आणि राजवैभव प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला भाविकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

दरवर्षी या वर्षीही परंपरेनुसार लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या लकी ड्रॉ चा निकाल जाहीर झाला आणि नशीबवान स्पर्धकांना ठरल्याप्रमाणे पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:23 PM 27/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here