आम्हांला उपासमारीपासून वाचवा : इम्रान खान

0

इस्लामाबाद : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून पाकिस्तानातचीही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कोरोनामुळे पाकिस्तानातील सर्व व्यवसाय डबघाईला आलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचं आवाहन जगाला केलं आहे. पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशाची अर्थव्यवस्था कोरोनासारख्या महारोगराईचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जगातील बड्या संस्थांनी अशा विकसनशील देशांना मदत करण्यासाठी आणि त्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोहीम सुरू करण्याची गरज असून, त्यासाठी पुढे यायला हवं, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानला लवकरच मदत केली नाही तर कोरोनाच्या आधी लोक उपासमारीने मरतील. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी विकसनशील देशांनी मदत करावी, जेणेकरून कोरोना व्हायरसच्या आव्हानांवर आम्ही मात करू, असं आवाहनही खान यांनी केलं आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here