जिल्ह्यातील १०३ जणांचे कोरोना अहवाल प्रतीक्षेत

0

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ९ ते ११ एप्रिलदरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमधील संशयित १०३ करोना रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. ते मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून आहेत. त्या सर्वांचे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत. जिल्हा रुग्णालयात ६२ जण करोनाविषयक निगराणीखाली आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाइनखाली १ हजार ५३ व्यक्ती आहेत. संचारबंदी वाढविण्याच्या पार्श्वभूमीवर त्या सर्वांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयासह संस्थात्मक क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या ३०२ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here