स्टोव्हचा भडका उडून होरपळून महिलेचा मृत्यू

0

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथील ३४ वर्षीय विवाहीत महिलेला स्टोव्हच्या भडक्याने जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला स्टोव्हच्या भडक्यात ८५ टक्के भाजली होती. या महिलेला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. योगिता मोहिते (३४, करंबेळे, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

HTML tutorial

सविस्तर वृत्त असे की, योगिता या जेवण करत असताना सोमवार २६ सप्टेंबर रोजी स्टोव्हचा भडका उडाल्याने भाजल्या. त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी सायंकाळी उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना मंगळवार २७ रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 28/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here