शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी केंद्रियभूत प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ मार्गदर्शन कार्यशाळा

0

रत्नागिरी : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी हे कोकणातील पहिले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मागील वर्षी सन २०२१-२२ मध्ये चालू करण्यात आलेले आहे. महाविद्यालयासाठी एक स्वतंत्र इमारत असून या महाविद्यालयात एकूण पाच अद्यावत शाखांचे पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे याचा मुख्य उददेश कोकणातील होतकरु विद्यार्थ्यांना सहज उत्तम प्रतीचा रोजगार मिळावा किया स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी येथे यावर्षीची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा शुक्रवार दि. ३०.०९.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजीत करण्यात आली आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी ही संस्था DBATU शी सलग्न असून AICTE ची मान्यता प्राप्त शासकीय संस्था आहे.

प्रथम वर्ष प्रवेशासाठी दि.२१.०९.२०२२ पासून प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून सदर प्रक्रियेबाबत कोकणातील विद्यार्थी व पालकांच्या मार्गदर्शनाकरिता या संस्थेन संस्थेच्या इमारतीत मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तरी सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी संस्थेच संकेतस्थळ Www.gcoer.org अथवा https://dte.maharashtra.gov.in किंवा https://cetcell.mahacet.org या वेबसाईटवर माहिती पहावी अथवा अधिक माहितीसाठी प्रा. बु. एल. देशपांडे, अधिष्ठाता शैक्षणिक व डॉ. यु. एस. बानखंड. अधिष्ठाता प्रशासन अथवा डॉ. एस. एन. खते, प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here