राज्यातील सर्व नाट्यगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करण्यात यावेत : मुनगंटीवार

0

मुंबई : राज्यातील नाटयगृहांचे आधुनिकीकरण आणि अद्यावतीकरण करताना राज्यातील सर्व नाटयगृहांसाठी टाईप प्लॅन (नमुना नकाशा) तयार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

राज्यातील नाटयगृहांच्या समस्यांबाबत बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी नाटयनिर्माता दिलीप जाधव, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, विद्या वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सर्व नाटयगृहांसाठी टाईप प्लॅन तयार करताना आसन क्षमतेप्रमाणे नियोजन करण्यात यावे. साधारणपणे 400, 600,800 आणि 900 आसन क्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी अभ्यासण्यात याव्यात. साधारणपणे प्रत्येक नाटयगृहांसाठी 4 कोटी ते 10 कोटी रुपयांची आवयकता असून हा निधी कसा देता येईल याबाबतचा नियोजन आराखडा तयार करण्यात यावा तसेच निधी वितरणाचे टप्पेही ठरवून घेण्यात यावेत.

राज्यात सध्या एकूण 83 नाटयगृहे आहेत. यापैकी खाजगी 28 नाटयगृहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित 51 आणि राज्य शासनाची 4 नाटयगृहे आहेत. या सर्व नाटयगृहाचे आधुनिकीकरण पुढील 10 वर्षांतील तंत्रज्ञानाचे बदल करताना आधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या नाटयगृहाचे नावीन्यपूर्ण नियोजन करुन काम करणे गरजेचे असल्याचेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:50 PM 28/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here