रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गोगटे महाविद्यालयातील JEE, NEET परीक्षेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

0

रत्नागिरी : सन 2022 मध्ये पार पडलेल्या JEE व NEET परीक्षेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. गोगटे जोगळेकर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी मधील विद्यार्थिनी कु. अनुपमा कुलकर्णी हिने NEET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ७२० पैकी ५८६ गुण मिळवून रत्नागिरीमधून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.

HTML tutorial

तसेच JEE 2022 परीक्षेत पार्थ पाटकर (AIR 898), कु. राज वायंगणकर, यश ओकटे यांनी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले असून यश ओकटे याचा सुरत NIT मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या भरघोस यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन आणि संस्थेचे सेक्रेटरी श्री. सतीशजी शेवडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे इतर मान्यवरही उपस्थित होते.

या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्यांनी केलेले वक्तव्य
ज्या विद्यार्थ्यांना यापुढे JEE व NEET परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे यश संपादन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांना या संदर्भातील माहिती 7038111104 या क्रमांकावर संपर्क करून घेता येईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
06:00 PM 28/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here