रत्नागिरी: ग्रामपंचायतींच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत ९ अर्ज अवैध

0

रत्नागिरी : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. बुधवारी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये १२५ उमेदवारी अर्जांपैकी ९ अर्ज अवैध ठरले. बाद झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी सर्वाधिक ७ अर्ज शिरगाव ग्रामपंचायती मधील आहेत.

मोठ्या राजकीय घडामोडीनंतर प्रथमच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ही महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सेना अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचयात समिती आणि विधानसभा निवडणुकीची ही रंगीत तालिम माणली जात असल्याने या निवडणुकींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण तापु लागले आहे. तालुक्यातील महत्वपूर्ण आणि प्रतिष्ठित चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा यात समावेश आहे. यामध्ये शिरगाव, चरवेली, पोमेंडी खुर्द आणि फणसोप ग्रामपंचायतीचा समावेश आहे. थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार असल्याने या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शिरगावा, पोमेंडी खुर्द आणि फणसोप ग्रामपंचायतीमध्ये महाविकस आघाडीने उडी मागली आहे. सेनेची ग्रामीण भागात मोठी ताकद असली तरी शिंदे सेना देखील कमी नाही. उद्योग मंत्री उदय सामंत आणि त्यांचे समर्थक देखील मुरलेले आहेत. ग्रामीण भागातील राजकारण कसे फिरवायचे याच्या राजकीय खेळी शिंदे सेनेतेली मुरब्बींनाही माहित आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. शिंदे सेनेला भाजप किती पाठिंबा देणार यावर शिंदे गटाचे भवितव्य ठरणार आहे.

चार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ११ तर सदस्य पदाच्या ४६ जागांसाठी १२५ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्ज बुधवारी छाननी प्रक्रिया झाली. या प्रक्रियेत शिरगाव ग्रामपंचायती मधील ७ उमेदवारी अर्ज तर फणसोप ग्रामपंचायती मधील २ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 29/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here